Skip to content Skip to footer

पोलीस कर्मचारी खैरमोडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी आमदार राम कदम यांचा दबाव

पवई पोलीस स्थानकातील एका पोलीस कॉन्स्टेबलला भाजपा आमदार राम कदम यांच्या तीन कार्यकर्त्यांनी काल मारहाण केली होती. या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी चक्क पोलीस स्थानकात फोन करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातील वृत्त लोकमत वृत्तपत्र समूहाने प्रसिद्ध केले होते.

नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खैरमोडे यांना भाजपच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या तीन भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या तिघांना वाचवण्यासाठी आमदार राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला होता. आता या दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

पवईच्या हिरानंदानी पार्क येथे एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपा कार्यकर्त्यांच्या दुचाकी गाडीने धडक दिली होती. नियमांचे उल्लंघन करत ते तिन्ही कार्यकर्ते एकाच गाडीवरून प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी नितीन खैरमोडे दाखल झाले. या तिन्ही आरोपींना रिक्षातून घेऊन जाताना तिन्ही आरोपींनी खैरमोडे यांना जबर मारहाण केली या मारहाणीत खैरमोडे रक्तबंबाळ झाले होते. तसेच त्यांच्या हाताला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती.

Leave a comment

0.0/5