Skip to content Skip to footer

निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट मिळते – रेखा शर्मा

निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट मिळते – रेखा शर्मा

महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणे गरजेचे आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले जाते’ असे राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या आहेत आता त्यांच्या या विधानाने एकच खळबळ माजली आहे.

शर्मा या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

यावेळी बोलताना रेखा शर्मा यांनी महिलांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यांनी सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे सांगितले. मात्र ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5