Skip to content Skip to footer

थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच नाव, राज्य सरकारने काढले परिपत्रक

थोर व्यक्तींच्या यादीत शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.

२०२१ मध्ये राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत १५ डिसेंबर २०२० चे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे. या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5