Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांची बैलगाडीतून मिरवणूक,स्वागताला तुफान गर्दी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा आज निफाड येथे दाखल झाली. निफाडच्या चेहडी भागातून आदित्य ठाकरे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्या स्वागताला लोकांनी तोबा गर्दी केली होती. आदित्य ठाकरे विराजमान असलेली बैलगाडी आकर्षक सजवण्यात आली होती. गाडीला जुंपलेल्या बैलांनाही झूल, गोंडे इत्यादी सजावट केली गेली होती. बैलगाडीवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. आदित्य ठाकरेंचं हे अनोखं स्वागत पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी केलेली होती.

आदित्य ठाकरे यांच्या रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी महिलांनी ठाकरेंचं औक्षण केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी निफाडमधील पिंपळस येथील गणेशाचं दर्शन घेतलं. रॅलीदरम्यान आदित्य ठाकरेंचं स्टेजवर आगमन होताच त्यांची छबी टिपण्यासाठी शेकडो तरुणांनी कॅमेरे/मोबाईल उंचावले. एकूणच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचं भव्य स्वागत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तरुणाईत आदित्य ठाकरेंची क्रेझ असल्याचं यानिमित्तानं दिसून आलं.

3 Comments

 • Pravin gaikwad
  Posted July 21, 2019 at 11:11 pm

  राॅयल एट्री

 • tattoos tumblr unique
  Posted September 1, 2019 at 6:54 am

  four. Girls favor watercolor tattoos much more than boys.

 • Hudson
  Posted January 22, 2020 at 1:32 pm

  Hi, I do believe your site could be having web browser compatibility problems.
  Whenever I take a look at your website in Safari, it looks fine but when opening in IE, it has some overlapping issues.

  I just wanted to give you a quick heads up!
  Apart from that, fantastic blog! https://entreprisesmst.com

Leave a comment

0.0/5