Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरवात

राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी १५ जानेवारीला मतदान होत आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मार्च २०२०मध्ये सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार १७ मार्च २०२० ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१६, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२.

Leave a comment

0.0/5