Skip to content Skip to footer

मुंडे यांचे मंत्री पद वाचणार, भाजप आणि मनसेने दिलेली ‘साथ’ येणार कामी !

एका महिलेकडून सामाजिक न्याय मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या मुंडेंना तूर्तास दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांचे मंत्री पद कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्र्वादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंग आणि हनी ट्रॅपचे आरोप केल्याचा मुद्दा मुंडे यांच्या चांगलाच फायद्याचा पडल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून पक्ष म्हणून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारीच सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गुरूवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजप आणि मनसे नेत्यांनी त्या महिलेविरुद्ध केलेले हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा मुद्दा महत्वाचा ठरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5