Skip to content Skip to footer

बविआला धक्का, आमदार ठाकूर यांच्या खंद्या समर्थकांचा लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश ?

मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. तसेच वसई-विरारमध्ये राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यात बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हा ठाकूर कुटुंबासाठी मोठा झटका मानला जात आहे.

पंकज देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत बहुजन विकास आघाडीला जाहीर अलविदा केला आहे. पंकज देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आगामी वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बविआला धक्का बसून शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीचे माजी उपमहापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नातेवाईक आहेत. तर माजी सभापती निलेश देशमुख यांचे चुलतभाऊ आहेत. पंकज देशमुख यांचे नालासोपारा शहरात युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5