Skip to content Skip to footer

संभाजीनगरात ४३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकणार – आमदार अंबादास दानवे

 

ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेने आपली शक्ती पुन्हा एकदा दाखवून देत दणदणीत विजय मिळवला आहे यामध्ये एकूण ६१६ जागांपैकी ३६० ठिकाणी शिवसेनेने स्वबळावर बहुमत मिळवले आहे तसेच ७२ ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत प्राप्त केले आहे यामुळे जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतीवर शिवसेना भगवा फडकवणार असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानुसार वैजापूर तालुक्यात ७३ जागा, पैठण तालुका ७७ जागा, सिल्लोड तालुक्यात ६७ जागा, कन्नड तालुक्यात ३९ जागा, संभाजी नगर तालुक्यात १५ जागा, गंगापूर तालुक्यात ३७ जागा, सोयगाव तालुक्यात २८ जागा, रत्नपुर तालुक्यात ७ जागा, फुलंब्री तालुक्यात १७ जागांवर एकट्या शिवसेनेने स्वबळावर यश संपादन केले आहे.

या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाठ, आमदार मनीषा कायदे, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली हा विजय प्राप्त केला तसेच शिवसेनेचे सर्व उपजिल्हा प्रमुख तालुकाप्रमुख पदाधिकारी यांनी यश मिळवण्याकरीता प्रचंड मेहनत घेतली होती.

या आधी झालेल्या मागील ग्रामपंचायत निवडणुकीत २८७ ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होत्या आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालानुसार शिवसेनेची संख्या ३६० आणि ७२ अशी ४३२ वर गेली आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5