Skip to content Skip to footer

एकही रुग्ण नसलेल्या कोविड सेंटरला ३ कोटी १४ लाखाचे बिल पास!

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असलेले प्रमाण लक्षात घेऊन अनेक ठिकाणी राज्य सरकार आणि मनपाच्या आर्थिक साह्याने कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मात्र एकही रुग्ण नसलेल्या कोविड सेंटरला ३ कोटी चौदा लाख अदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पिंपरी चिंचवड मानपामधून समोर येत आहे. जर कोविड सेंटरमध्ये रुग्णच दाखल झाले नाही तर बिल कशाचे अदा करण्यात आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रकरण असे की, पिंपरी- चिंचवड महानगरपालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर खाजगी संस्थांना चालविण्यास देणेकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदानुसार मे. स्पर्श मल्टिस्पेशालिटी यांना रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या ठिकाणचे प्रत्येकी ३०० बेडचे सेंटर चालविण्याकरिता आदेश देण्यात आले होते.
मात्र शासनाने कोविड सेंटर उभारण्यासाठी घालून दिलेल्या अटी आणि शर्तीनुसार कोणताही नियम स्पर्श मल्टिस्पेशालिटी या संस्थेकडून पाळले न गेल्याचे सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. तसेच शासनाने ठरवून दिलेली अनामत रक्कम सुद्धा न भरल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सादर कोविड सेंटरचे बिल अदा करण्यात आले नव्हते.

मात्र या सर्व आदेशांना बगल देऊन शासकीय अधिकाऱ्यांनी आपला आदेश धुडकावून लावून बेकायदेशिरपणे काही देय रक्कम नसताना व सदर खर्चास स्थायी समितीची मान्यता नसताना फॉरच्यून स्पर्श हेल्थ प्रा . लि . या चालू खात्यावर ३,१४,०१९०० / – ( रक्कम रूपये तीन कोटी चौदा लाख एक हजार नऊशे ) रक्कम जमा करण्यात आली आहे. यावर आता चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5