Skip to content Skip to footer

राज्य सरकारला विचारात न घेता MPSC ची न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

राज्य लोकसेवा आयोगाने(MPSC) सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तीव्र नाराजी दाखवत संताप व्यक्त केला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची नाराजी दिसून आली तसेच त्यांनी आपली नाराजी बैठकीत उघड-उघड बोलून दाखवली.

सदर याचिका मराठा कोट्याबाबतच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करते. सरकारचा सल्ला न घेता महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एइबीसी पदांवरुन राज्य लोकसेवा आयोग विरुद्ध ठाकरे यांच्यातील संघर्षाचे जोरदार पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. दाखल केलेल्या याचिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींविरूद्ध कडक कारवाई करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Leave a comment

0.0/5