Skip to content Skip to footer

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपा नेते कृष्ण हेगडे म्हणतात सत्यमेव जयते !

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेंविरोधातील बलात्काराची केलेली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी पोलिसांना लेखी स्वरूपात लिहून दिले आहे.

त्यात रेणू शर्मांनी आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप करणारे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली असल्यास मी खुश आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो.

पुढे हेगडे म्हणतात की, सत्यमेव जयते… रेणू शर्मा रिलेशनशीपसाठी माझ्याही मागे लागली होती. पण हे प्रकरण संपलंय, त्यामुळे त्यांच्याविरोधात मला काहीही सांगायचं नाही. बॉलिवूडमध्येही मीटूचे अनेक प्रसंग घडले होते. खऱ्या पीडितांसोबत आपण कायम उभं राहायला पाहिजे, पण या प्रकरणात मला आणखी काही बोलावंसं मला वाटत नाही.

Leave a comment

0.0/5