Skip to content Skip to footer

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक गुरुवारी बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी खासदारांसोबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रात रखडलेल्या राज्यातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपचे खासदारही उपस्थित राहिले होते.

खासदारांचे राज्य शासनाकडे जे प्रलंबित विषय आहेत त्यावर मार्ग काढला जाईल. विभाग आणि विषय निहाय खासदारांच्या समित्या स्थापन करून विविध बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल, असे बैठकीत आश्वस्त करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेला खासदारांकडूनही अपेक्षा आहेत. राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्या जनतेच्या हिताचे प्रश्न प्राधान्यक्रम ठरवून सोडवले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक खासदाराने केंद्र शासनाकडून राज्य शासनाला जास्तीत जास्त निधी मिळवून दिला पाहिजे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्नाटकात सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी याप्रश्नी त्यांची भूमिका सारखीच असते. आपणही एकजूट दाखवून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केले. त्यावर खासदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

Leave a comment

0.0/5