Skip to content Skip to footer

उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रीचकॅण्डी रुगालयात दाखल करण्यात आलेले आहे. अंगात थकवा व कणकण असल्यामुळे अजित पवार दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झाले होते. मात्र आज सकाळी त्यांना उपचारांसाठी ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले होते. त्यात सततचा प्रवास करून त्यांना थकवा जाणवत होता.

त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र, घरातून त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरू होते. अजित पवारांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5