Skip to content Skip to footer

बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्व

बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली आपल्या कणखर भाषा, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, “सामना” या पत्रिकेचे संस्थापक, संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्या पुढे येतं. महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची मुख्य भूमिका होती. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !

दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

Leave a comment

0.0/5