Skip to content Skip to footer

शक्ती कायद्या अंतर्गत खोट्या तक्रारी देणाऱ्या महिलांवर होणार कारवाई – अनिल देशमुख

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसण्यासाठी ठाकरे सरकार लवकरच राज्यात शक्ती कायदा लागू करणार आहे. मात्र दहा ते वीस वर्षानंतर हेतूंपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी काही महिला करताना आढळून आल्या आहेत.

या करण्यात आलेल्या तक्रारीपैकी बहुसंख्य तक्रारी या खोट्या असतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपुरातील बल्लारपूरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या संदर्भात बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, “शक्ती कायद्यासंदर्भात लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सूचना प्राप्त झालेल्या असून लवकरच हा कायदा लागू होणार आहे.

महिला अत्याचाराच्या घटना अधिक असल्या तरी महिलादेखील दहा ते बारा वर्षापूर्वीच्या घटनांचा संदर्भ देत पुरूषांविरोधात तक्रारी करतात. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करतात, अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करतात. अशा महिलांवरही कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात आहे”. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

Leave a comment

0.0/5