Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू – विश्वास नागरे पाटील

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागच्या एक महिन्यांपासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक चर्चा होऊन सुद्धा अदयाप तोडगा निघालेला नाही. या कृषी कायद्याविरोधात आझाद मैदान येथे आंदोलन छेडण्यात आले असून नाशिक येथील हजारो आदिवासी शेतकरी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदान येथे जमले आहेत.

मात्र दक्षिण मुंबईत होणाऱ्या शेतकरी संघटनेच्या मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे, असे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हणून दाखविले आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र राजभवनला जावं अशी त्यांची‌ इच्छा आहे पण कोर्टाच्या आदेशाने दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत‌ नाही, आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत असे नांगरे पाटील म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 800 पोलिस कर्मचारी-अधिकारी करण्यात आले आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, असा आमचा प्रयत्न असेल असं नांगरे पाटील म्हणाले.

Leave a comment

0.0/5