Skip to content Skip to footer

भाजपचा एक गट शेतकरी आंदोलनात घुसल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण – संजय राऊत

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे आता सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. त्यात शेतकरी आंदोलक आणि दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा जबर मारहाण झालेली आहे. त्यात महाराष्ट्रातील एका शेतकरी महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यामुळे आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आज मुंबई येथे पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप लगावला आहे.

सरकारने एक प्रकारची दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले, असे म्हणतायत. ते खरोखर शेतकरी होते का असा प्रश्न आता निर्माण होतो. लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले होते. ते आता कुठे फरार झाले आहेत, कुठे गायब झाले आहेत, त्याचा आधी तपास करावा, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

जे आता फोटो आलेले आहेत, त्यात ते पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर आहेत. जे सिद्धू वगैरे लोक आहेत, ते कोण आहेत, कोणाचे आहेत. त्याचा तपास आधी करा. ते कुठे गायब झालेले आहेत, पण सरकारला यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे. त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडून त्यातील एक गट जो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन घुसला होता, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Leave a comment

0.0/5