Skip to content Skip to footer

फी न भरल्यामुळे एकाही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये – वर्षाताई गायकवाड

शिक्षण शुक्लासंदर्भात पालक आणि शाळा व्यवस्थापकांनी एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे. शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या आहेत.

कोरोना काळातल्या शुल्काचा वाद टोकाला पोहोचला होता. बुधवारी पुण्यात पालकांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना घेराव घातला होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या पालकवर्गाशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, वर्षाताई गायकवाड या पुणे दौऱ्यावर असतांना पुण्यातील पालकांनी गायकवाड यांना घेराव घातला. वर्षाताई गायकवाड या फी आणि परीक्षा संदर्भात ठोस भूमिका घेत नसल्याने पालक चांगलेच आक्रमक झाले होते. बालभारती भवनासमोर पालकांनी शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, कोरोना काळात शुल्क भरले नाही म्हणून एकाही शाळेने मुलांचे शिक्षण थांबवू नये, अशा सक्त सूचना आपण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्तिक ठरेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a comment

0.0/5