Skip to content Skip to footer

फाशी दिली तरी स्वीकारेल, पण तोंड बंद करणार नाही – सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने मंगळवारी सकाळी धाड टाकली. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते त्यात विहंग नाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेऊन तब्बल सात तास चौकशी केली होती. यावर आता आमदार सरनाईक यांनी वक्तव्य केले आहे. सरनाईक यांनी झालेल्या कारवाहीवर संताप व्यक्त केला आहे. ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. तसेच फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे असेही त्यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केले. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे असे सरनाईक यांनी म्हटलं आहे.

ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचे तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी इशारा दिला आहे.

Leave a comment

0.0/5