Skip to content Skip to footer

नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाला हायकोर्टाचा धक्का, स्थायी समितीत शिवसेनेच्या संख्याबळात वाढ

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीवरुन शिवसेना-भाजपा पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. न्यायालयाच्या निकालाने भाजपाला धक्का तर शिवसेनेच्या संख्याबळात वाढ झालेली दिसून येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थायी समिती संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून मिळाली आहे.

भाजपाचा एक सदस्य घटल्यामुळे स्थायी समितीवर असलेल्या भाजपाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. दोन नगरसेवक घटल्याने भाजपचे संख्याबळ आठच असण्याबाबत शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजपाने दिली आहे.

स्थायी समिती संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या आता एकाने वाढणार आहे. सत्ताधारी भाजपाला हायकोर्टाच्या या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे.

Leave a comment

0.0/5