Skip to content Skip to footer

गोरेगाव येथे एनसीबी अधिकारी तुषार वानखडे यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

गोरेगाव येथे एनसीबी अधिकारी तुषार वानखडे यांच्यावर प्राणघातक हल्ला..!

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीची टीम ड्रग्ज कनेक्शनच्या शोधात आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींची सुद्धा ड्रग्स प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. तसेच अनेकांना ताब्यात सुद्धा घेतले होते. त्यामुळे ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहे. ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. एनसीबीच्या ५ अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलरकडून हा हल्ला झालाय. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही घटना घडली. ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

समीर वानखेडेंच्या अंतर्गत एनसीबीती ही टीम मुंबईत काम करत आहे. हल्ला झाला त्यावेळी समीर वानखडे स्वत: तिथे होते का ? याची माहिती समोर आलेली नाही. पण एनसीबीचे दोन अधिकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर ३ अधिकारी सुरक्षित आहेत. ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून होते आणि संधी साधून त्यांनी हा हल्ला केला. या प्रकरणाचा अधिक तपास एनसीबी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मुंबई पोलीस करत आहेत.

Leave a comment

0.0/5