Skip to content Skip to footer

भाजपा नेता गोतस्करी रॅकेटमधला मुख्य आरोपी

 

कत्तलीसाठी गोवंशांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा मध्यप्रदेश पोलिसांनी पदार्फाश केला होता. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करत १० जणांना अटक केली आहे. गोवंशांना कत्तलीसाठी नागपूरच्या जिल्ह्यात नेले जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव गोतस्करी करणाऱ्या रॅकेटचा प्रमुख असल्याची माहिती समोर आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायी आणि बैलांची मध्यप्रदेशातल्या बाकोडा गावातून तस्करी केली जात होती. हा भाग जंगल परिसरात येतो. नागपूरमध्ये नेऊन गाय, बैलांची हत्या करण्यात येणार होती. याची माहिती मिळताच लालबुरा पोलीस ठाण्याचं गस्ती पथक बाकोडा इथं पोहोचले. यावेळी गायींची वाहतूक करणारे पोलिसांना मद्यधुंद अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे गायी-गुरांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही प्रमाणपत्रं नव्हती.

गायींची वाहतूक करणाऱ्यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ही जनावरं भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता मनोज पारधीची असल्याची माहिती त्यांनी दिली. पारधी आणि पाठक यांनी गायी-गुरांना कत्तलीसाठी नागपूरला नेण्यास सांगितलं असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं. यानंतर पोलिसांनी १० जणांना घटनास्थळावरून अटक केली.

Leave a comment

0.0/5