Skip to content Skip to footer

जलील यांच्या घराखाली फायरिंग, चुकून निवडणूक आलेल्या खासदाराने शिकवू नये – चंद्रकांत खैरे

खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीचा व्हिडिओ व्हायरल केल्या नंतर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांची असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना खैरे म्हणाले की, संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे चुकून निवडून आलेले खासदार आहेत. आता लोकांना पश्चात्ताप होत आहे. जलील हे दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही खैरे यांनी जलील यांच्यावर केला होता.

जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात. खैरे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जलील यांच्या घराच्या बाजूलाच बंदूक चालली. एका भंगारवाल्याने ही बंदूक चालवली. उद्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्याकडे कोणीही दादागिरी करत नाही. बंडखोऱ्या, दगडफेक असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत,” असे खैरै यांनो बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5