Skip to content Skip to footer

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी केंद्राची स्थिती – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल १ हजार रुपये लिटर करुन सर्वसामान्यांना सरकारला मारायचे असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच, केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे परिणाम आगामी ६ महिन्यांत कळतील. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती केंद्र सरकारची झाली आहे, असेही राऊत म्हणाले.

सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

पेट्रोल १ हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे, अशी टीका राऊत यांनी केलीये. तसेच आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली असेल, तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून तो एका पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असा घणाघात राऊत यांनी केला.

Leave a comment

0.0/5