Skip to content Skip to footer

अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमावार दहशतवादी हल्ला, अनेक जण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात काही जण जखमी झाले आहेत. मात्र अद्याप निश्चित आकडा समजलेला नाही. मात्र या हल्ल्यात आगामी निवडणूकीतील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम जखमी झाले असल्याचे समजते. स्फोटानंतर करझाई यांच्यासह सर्व नेत्यांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलविले.

शिया हजारा नेते अब्दुल अली मझारी यांच्या 24 व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार हनीफ अत्तार व त्यांचे आठ सुरक्षा रक्षक, राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम जखमी झाले. तसेच कार्यक्रमाला उपस्थितांपैकी देखील काही जण जखमी झाल्याचे समजते. या सर्व जखमींना स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5