Skip to content Skip to footer

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावर महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, हा अर्थसंकल्प देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको. तसेच हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे.

तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तत्पूर्वी यावर्षीच्या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना व त्याआधीही ही रोजगार संपला असताना रोजगार निर्मितीचे काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

Leave a comment

0.0/5