Skip to content Skip to footer

अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांनी ‘त्या’ फोटोसंदर्भात भाष्य केले

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहभोवती गुन्हेगारांचा कोंडाळं असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटो सेशनमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यावर आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते पत्रकार माध्यमांशी मुंबईत बोलत होते.

मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन असे अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही संभाजीनगरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत.

Leave a comment

0.0/5