Skip to content Skip to footer

महाराष्ट्राला मदत देऊ नका इथं आपले सरकार नाही, असा सल्ला मोदींना राज्यातील भाजपा नेते देतात का? – जयंत पाटील

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.

जयंत पाटील अर्थसंकल्पाबाबत बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने सगळं विकायला काढले आहे. मागच्या सरकारने जे बनवलं, ते हे विकत आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

तसेच राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, त्यामुळे मदत करु नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतात की काय, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Leave a comment

0.0/5