Skip to content Skip to footer

हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या ८ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश

कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला एका वयोवृद्ध गृहस्थाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुण्यातील ८ जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. हर्षवर्धन जाधव यांना अमन चड्डा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. सदर प्रकार पुणे येथे घडलेला आहे.

सदर प्रकरणात न्यायालयाने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधवांना जामीन मिळण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र आता हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण १५ डिसेंबरला सांगण्यात आलं होतं. अखेर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रीतसर अटक केली होती.

Leave a comment

0.0/5