Skip to content Skip to footer

शरजील उस्मानीवर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

एल्गार परिषदेत हिंदुच्या भावना दुखावल्या प्रकरणी शारजील उस्मानीवर सर्व स्तरातून टीका झाली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी उस्मानीवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यावर आता उस्मानीवर कारवाई होणारच असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलून दाखविले आहे. ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या भाषणावर भाजपाने कडाडून आक्षेप घेतला आहे. हिंदू समाजाबद्दल त्याने अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तवे करणारा अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5