Skip to content Skip to footer

हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – गुलाबराव पाटील

एल्गार परिषदेत हिंदुच्या भावना दुखावल्या प्रकरणी शारजील उस्मानीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी उस्मानीवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यावर आता शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

या संदर्भात जेव्हा प्रसार माध्यमांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा मंत्री पाटील म्हणाले की, हिंदू धर्माला किंवा इतर धर्माला टीका करणे चुकीचे आहे. जर त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली तर या सर्व प्रकाराची योग्य प्रकारे चौकशी करून १०० टक्के कारवाई केली जाईल असे त्यांनी बोलून दाखविले होते.

जेव्हा पत्रकारांनी चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रं लिहून उस्मानीवर कारवाई करण्याची मागणी करण्यासंदर्भात जेव्हा त्यांना विचारले तेव्हा पाटील म्हणाले की, जे योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा चप्पल घालून करतात त्यांच्याकडून कारवाईची काय अपेक्षा ठेवायची असा टोला त्यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला होता.

Leave a comment

0.0/5