Skip to content Skip to footer

हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपाने घेतलेले नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला

हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.

‘लोकसत्ता’च्या ७३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे बुधवारी बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना, आरे कारशेड अशा अनेक विषयावर भाष्य केले होते. मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे.

एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो असे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5