Skip to content Skip to footer

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला राजकिय चर्चांना उधाण

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. २०१४ मध्ये देशासह राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकांआधी अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यामुळे अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने विजयाचा पताका रोवला होता.

मात्र आता मानपामध्ये भाजपच्या अनेक नगरसेवकांनी नाराजीचा सूर ओढला आहे. त्यामुळे अनेकजण भाजपाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत. त्यात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा जास्त जोराने या भागात कामाला लागले आहेत.

भाजपामधील नाराज नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे येत्या काळात शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. पिंपरीतील २५ ते ३० नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांची भेटही घेतली आहे. यामुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ माजली आहे.

Leave a comment

0.0/5