Skip to content Skip to footer

कोल्हापूर झेडपीत भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्याने केला महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महिला अधिकाऱ्याने भाजपाच्या विरोधी पक्षनेत्यावर गंभीर आरोप लावले आहे. त्यामुळं कोल्हापुरात एकाच खळबळ उडाली आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते विजय भोजे यांच्यावर महिलेने विनयभंगा सारखा गंभीर आरोप केला आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर विजय भोजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात भोजे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजे यांनी आपल्याला घरी बोलावून विनयभंग केल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विजय भोजे हे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत.

दरम्यान, विजय भोजे यांनी मात्र आपल्यावरील विनयभंगाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मॅट घोटाळा बाहेर काढल्याचा रागातून आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा त्यांनी केला आहे. विनयभंगाचे खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केल्याचा दावा विजय भोजेंनी केला आहे.

Leave a comment

0.0/5