Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भावुक झाले तर चांगले होईल.” – अजित पवार

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झालेले पाहायला मिळाले होते. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्रातील मोदी सरकार ज्याप्रकारे आंदोलन हाताळत आहेत यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल.” मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यावेळी गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पहायला मिळाले होते यावरचं अजितदादांनी टोला लगावला होता.

Leave a comment

0.0/5