Skip to content Skip to footer

बाबरी आम्हीच पडली हे लक्षात असू द्या, राऊतांचा कंगनाला टोला

मागच्या काही दिवसापासून मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यामुळे कंगना रानौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्विटर युद्ध पाहायला मिळाले होते. त्यातच कंगनाच्या मुंबईस्थित अनधिकृत कार्यालयांवर मनपाचा हातोडा पडला. त्यामुळे चवताळलेल्या कंगनाने सेनेचा “बाबरी सेना” असा उल्लेख केला होता.

कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, कंगनाच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे उत्तर केवळ महापालिका आयुक्तच देऊ शकतील. जर कुणी कायदा मोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशा वेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही.

कंगनाने केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून संजय राऊत यांनी सुनावले आहे. राऊत म्हणाले की, “बाबरी पाडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगनाशी माझं वैर नाहीये. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे, ती कदापि सहन करण्यासारखी नाही.

Leave a comment

0.0/5