Skip to content Skip to footer

“औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही लोकांची मागणी आहे.” – एकनाथ शिंदे.

मागच्या अनेक दिवसांपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यावर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते आज नगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री शिंदे म्हणाले की, “औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही लोकांची मागणी आहे, ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हे नामांतराचे धोरण ठरवताना औरंगजेबाबाबत कोणालाही प्रेम असण्याचे कारण नाही.” असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

“छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या राज्याची व राष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मागणी लक्षात घेऊन त्याबाबत आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट केली आहे. तसेच इतर शहराच्या नामांतरणबाबत तेथील लोकांची काही मागणी असतील ,तर जनतेसोबत आम्ही आहोत.” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5