Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे यांच्या हाती घड्याळ आता बावनकुळे लवकरच निर्णय घेतील.” – जयंत पाटील.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी आता भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची खुली ऑफरच दिली आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी, “खडसे यांच्यानंतर बावनकुळे सुद्धा लवकरच निर्णय घेतील.” असे विधान केले होते.

“आज भाजपमध्ये बहुजन नेत्यांना दाबण्याचा आणि पक्षामधून बाहेर काढण्याचा डाव आखला जात आहे. मागच्या २०१९ च्या विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारले. नंतर त्यांच्या पत्नींना तिकीट देऊन त्यांना अर्ज भरू नका असे सांगण्यात आले. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपात होत आहे.

आज एकनाथ खडसेंना लक्षात आले त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळेंना लक्षात येईल आणि बावनकुळेही लवकरच निर्णय घेतील.” असे म्हणत मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची ऑफरच दिली होती. यावर आता बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5