“वंदनीय बाळासाहेब दवाखाण्यासाठी आणि नाट्यगृहासाठी ५ कोटी देणार.” – एकनाथ शिंदे.

नगर येथील जिल्हाधिकारी भवनात जिल्ह्याच्या नियोजित विकासकामांची आढावा बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. यावेळी त्यांनी नगरमधील बाळासाहेब ठाकरे दवाखान्यासाठी ५ कोटी, तर १ हजार आसनी नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची घोषणा केली आहे.

या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर महापालिकेअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि ५ नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी आणि विकास यंत्रणा कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.

मंत्री शिंदे म्हणाले की, “कोरोनाच्या संसर्गामुळे राज्याच्या आर्थिक अडचणी वाढल्या असल्या तरी विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र विकासकामे करताना महत्वाची कामे करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिका, नगरपरिषदांनी स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.” अशा सूचना सुद्धा मंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here