Skip to content Skip to footer

“तुकाराम मुंढे आले आणि फाईल डब्यात गेल्या.” – संजय राऊत

“आयुक्त तुकाराम मुंढे आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तेव्हा फाईली वर आल्या.” असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. आज राऊत नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकच्या राणे नगर परिसरात विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले होते.

राऊत म्हणाले की, “आयुक्त तुकाराम मुंढे जेव्हा आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईली वर आल्या. यापुढे फाईली डब्यात जाणार नाहीत. महाराष्ट्रात वातावरण बदलत आहे. नाशिकचे वातावरण बदलले की महाराष्ट्रातलं वातावरण बदलतं. अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात आले.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “देशासाठी बलिदान देण्याची नाशिकची मोठी परंपरा आहे. निवडणुका येतात-जातात. निवडणुका येतात म्हणून आपण काम करतो असं नाही. आपल्या रक्तात सामाजिक कार्य आहे. शिवसेनेची ती परंपरा आहे. त्यामुळेच लोक आपल्यामागे उभे राहतात.” असे त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5