Skip to content Skip to footer

“एकनाथ खडसे यांना ईडीकडून २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा दिलासा”

 

भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहे. भोसरीमधील कथित जमीन गैररव्यवहार प्रकरणी न्यायालयाने खडसेंना २४ फेब्रुवारी पर्यंत दिलासा दिला आहे.

आज न्यायालयात युक्तिवाद अपूर्ण राहिलयमुळे न्यायाधीशांनी “पुढील सुनवाई २४ फेब्रुवारीला होईल असे जाहीर केले.” ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी एकनाथ खडसे यांनी मागणी केली आहे.

“इडीने बजावलेल्या समन्सला आपण पुन्हा हजर राहिलो आणि त्यावेळी जर इडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांना हवे असल्याप्रमाणे उत्तरे दिली नाही तर अटकेची भीती आहे. म्हणूनच मी हायकोर्टात आलो”. असे खडसे यांचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना सांगितले.

मात्र आज युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मुंबई हायकोर्टाने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची इडीची हमी कायम आहे.

Leave a comment

0.0/5