Skip to content Skip to footer

“मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळते.” राठोड यांची अजित पवारांनी केली पाठराखण.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात या प्रकरणी नाव गुंतल्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. तसेच ते नॉटरीचेबल असल्याचे बोलले जात होते. मात्र यावर आता मंत्रिमंडळातील सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत राठोड यांची बाजू घेतली आहे.

“संजय राठोड गायब नाहीत.” असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. काल मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. “पूजाच्या वडिलांनीही सांगितले आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतले जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल.” असंही अजित पवार यांनी बोलून दखविले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असंच घडलं, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली.” असे म्हणत राठोड यांची पाठराखण केली.

Leave a comment

0.0/5