Skip to content Skip to footer

मोदी सरकारने वाढवली गृहिणींची डोकेदुखी, घरगुती गॅसच्या किमतीत ७५ रुपयाने वाढ.

 

आता लवकरच घरगुती गॅस वरील अनुदान बंद होणार आहे. केंद्राने अनुदानात कपात केल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणाऱ्या अनुदानात २७० वरून थेट ४० रूपये कपात केली आहे. त्यामुळे एकाच महिन्यात दोनदा गॅस दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

आता या दरवाढीचा महिन्याभराच्या बजेटवर फरक पडला आहे. या दरवाढीची सर्वसामान्य नागरिकांना झळ सोसावी लागत आहे. सरकारने अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा कमी केल्याने ग्राहकांना मिळणारं अनुदानही कमी येऊ लागलं आहे. एका विनाअनुदानित सिलेंडरसाठी ८२१ रु. मोजावे लागतात. त्यावर सध्या २७० रु. अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.

घरगुती गॅसच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत ७१९ रु झाली आहे. आजपासून म्हणजेच ४ फेब्रुवारीपासून हे दर लागू झालेयत. डिसेंबरमध्ये अयओसी’ने घरगुती गॅसच्या किंमती दोनवेळा वाढवल्या. कंपनीने २ डिसेंबरला ५० रुपयांनी वाढ केली. त्यानंतर १५ डिसेंबरला ५० रु आणखी वाढवले आहे

Leave a comment

0.0/5