Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली महत्वाची बैठक.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उतरता आलेख दिसून येत होता. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी कोरोना संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण राज्यात पसरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

.
राज्यात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे अशा काही ठिकाणी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र लॉकडाउनवर आज होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

Leave a comment

0.0/5