Skip to content Skip to footer

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारले रेलरोको आंदोलन.

 

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यात कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज संपूर्ण देशभरात रेल रोको आंदोलनाची हाक दिली होती.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून आज दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल्वे रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. संयुक्त किसान मोर्चाकडून या देशव्यापी रेल रोको आंदोलनात सहभगी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, बिहार आदी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांना रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला असून, रेल्वे वाहतूक रोखण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे रेल रोको आंदोलन हरियाणात ८० ठिकाणी, पंजाबमध्ये १५ ठिकाणी सुरू झाले आहे अशी माहिती एनआयए या वृत्त संस्थेने दिली आहे. या आंदोलनाचा फटका दिल्ली मेट्रोला सुद्धा बसला आहे.

Leave a comment

0.0/5