Skip to content Skip to footer

“१० महिने वीजबिल न भरणाऱ्या ३६ हजार ग्राहकांवर महावितरणाची कारवाई”

 

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान चालू रिडींग न घेता ग्राहकांना वीजबिले पाठवण्यात आली होती. त्यामुळे अव्वाच्या-सव्वा आलेली वीजबिले न भरण्याचा निर्णय ग्राहकांनी घेतला होता. यावरून विविध पक्षांनी आंदोलने सुद्धा केली होती. मात्र आता वीज वितरक कंपनीने कारवाईचा करण्याचा बडगा उचलला आहे.

सतत आवाहन करूनही सलग दहा महिने वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांवर वीज कंपनींकडून कारवाई करण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण विभागातील अशा प्रकारच्या ३६ हजार १३९ ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. या ग्राहकांकडून ८९ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे.

लॉकडाऊननंतरच्या काळात थकबाकी न आल्यामुळे महावितरणची स्थिती अतिशय बिकट झाली होती. त्यामुळे वीज खरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जाचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5