Skip to content Skip to footer

“कांदळवनाची होणारी कत्तल रोखण्यासाठी कठोर पाऊले उचला” – आदित्य ठाकरे

“कांदळवनाची होणारी कत्तल रोखण्यासाठी तसेच ड्रेब्रीज टाकून मोठया झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्यांना तात्काळ आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ती पाऊले उचलून कडक कारवाई करण्यात यावी” असे आदेश पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

“पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने आज कांदळवनांचे महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच कांदळवनाच्या जागी संरक्षक भिंती किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात” अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या होत्या.

“कांदळवनांच्या संरक्षणासाठी डेब्रीज टाकणारी वाहने आणि संबंधीत विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच कांदळवनाचे महत्व पटवून देण्यात यावे.” अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

कांदळवनांचे जतन आणि संवर्धनासाठी आदित्य ठाकरे हे वेळोवेळी बैठका घेऊन याचा आढावा घेत आहेत. “मागील आठवड्यात कांदळवनांवर डेब्रीज टाकणाऱ्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला गती देण्यात यावी, संबंधित वाहने ताब्यात घेण्यात यावीत, तसेच फक्त वाहनचालकावर कारवाई न करता डेब्रीजचा स्त्रोत शोधून संबंधित बांधकाम विकासकावरही कारवाई करण्यात यावी.” अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

Leave a comment

0.0/5