Skip to content Skip to footer

मास्क, सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई’ – आयुक्त डॉ. विपिन शर्मा

मुंबई आणि ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. सध्या दररोज वाढत असलेली रुग्णसंख्या त्यामुळे मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यात आता ठाण्याचे मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सामान्य नागरिकांना कोविड संदर्भतील कडक नियम पाळण्याचे आव्हान केले आहे.

ठाण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने् कडक कारवाईचे संकेत आयुक्त शर्मा यांनी दिले आहेत.

तसेच वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रूग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन, रेड झोन, प्रतिबंधीत क्षेत्रात कडक निर्बंधासाठी गस्ती पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

Leave a comment

0.0/5