Skip to content Skip to footer

एसआरए’ची घरे आता विकता येणार पाच वर्षात, मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांची घोषणा’

“झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (SRA ) बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने एसआरए अंतर्गत मिळालेली घरे पाच वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती”. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

ज्या नागिरकांना एसआरए अंतर्गत घरे मिळालेली आहेत. त्यांना आपली घरे १० वर्षांपर्यंत विकता येत नव्हती. तसा प्रयत्न केलाच तर घऱमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, यानंतर आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णया अंतर्गंत घर विकण्याची १० वर्षांची मर्यादा पाच वर्षे करण्यात येणार आहे.

याविषयी अधिकची माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की. “राज्य सरकार एसआरए अंतर्गत असलेल्या घरांना विकाण्याची कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी ही मर्यादा १० वरुन ५ वर्षे केली जाईल. मात्र असे असले तरी सध्या १० वर्षांच्या आत SRA तील घरं विकणार्‍यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत” अशी माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली.

Leave a comment

0.0/5