Skip to content Skip to footer

शिवसेना आणि राष्ट्रवादी पुणे मनपा निवडणूक एकत्रितपणे लढणार – संजय राऊत

येणाऱ्या काही महिन्यात कोल्हापूर, नवी मुंबई , ठाणे आणि पुणे महानगर पालिकेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या होणाऱ्या मनपा निवडणुकीत आघाडीतील सर्व पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार अशी चर्चा होत आहे. या सर्व घडामोडीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुणे महानगर पालिका निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे.

पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार माध्यमांशी बोलत होते. पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महानगर पालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी बोलून दाखविले.

राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत असे सुद्धा राऊत यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5